पोष्टमन काका निवृत्त होत आहेत.....

  • 2.8k
  • 936

आरतीसम्राट सीतारामसुत *मोहन खामकर* नावाचा एक पोष्टमन टपाल खात्यातून निवृत्त होत आहे. आज मोहन नावाचा प्राणी जवळजवळ ६० वर्षाचा झाला. येत्या २७ एप्रिलला षष्टयाब्दीपूर्ती सोहळा आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जवळजवळ चाळीस वर्षे सकल दुनियेची पत्रे घरोघर पोहचविली. मोहन जेव्हा पत्रे घेऊन सायकलीवर टांग टाकून गल्लोगल्ली अंगात खाकी अंगरखा, डोईवर खाकी टोपी, खांद्याला लटकवलेली खाकी पिशवी. हातात पत्र आणि हातात सायकल. घंटी वाजवून वर्दी देणारा दर्दी पोष्टमन आणि वाट पाहणारा टपालकरी यांच्यातील नाते म्हणजे जिव्हाळ्याचे नाते. मात्र मनातल्या मनात तुकोबाच्या अभंगानुसार *केव्हा भेटसी केशवा.....* हि तगमग म्हणजे पोष्टमन या व्यक्तीला लोकांनी ईश्वराचे रूप मानले आहे. टपाल मनीऑर्डर ज्याचे त्याला देत एकमेकांची