सौभाग्याची शपथ - भाग 4 jayesh zomate द्वारा प्रेम कथाएँ में हिंदी पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करे

सौभाग्याची शपथ - भाग 4

EPISODE 4  💫सौभाग्याची शपथ 💫


सौभाग्याची शपथ मालिकेचं सुरुवाती गाण 
Soft romantic music start… flute + piano)

[Intro]
कुमकुम भाग्य… हो हो हो… ❤️
कुमकुम भाग्य… हो हो हो… ✨

[Verse 1]
तुझ्या नजरेत हरवून गेलो मी,
स्वप्नांचं घर बांधलं आपण दोघांनी…
हातात हात घेऊन चालताना,
नशिबाने दिली साथ गोड अशी…

[Chorus]
💖 कुमकुम भाग्य… हो हो हो…
आपलं प्रेम आहे साक्षी हो…
💖 सौभाग्याची शपथ घेतली आपण,
जन्मोजन्मी साथ देऊ हो…

Verse 2]
तुझ्या हास्यात माझं जग आहे,
तुझ्याशिवाय काहीच नाही…
मंगळसूत्राची ती शपथ गोड,
बंधन हे कधीच तुटणार नाही…

[Chorus Repeat]
💖 कुमकुम भाग्य… हो हो हो…
आपलं प्रेम आहे साक्षी हो…
💖 सौभाग्याची शपथ घेतली आपण,
जन्मोजन्मी साथ देऊ हो…

Bridge - emotional slow]
सावल्या जरी पडल्या आयुष्यात,
तुझा हात सोडणार नाही…
प्रेमाच्या या वाटेवरती,
शेवटपर्यंत सोबत राहीन…

[Final Chorus - high music]
🔥 कुमकुम भाग्य… हो हो हो…
नातं हे आहे खास हो…
🔥 सौभाग्याची शपथ आपली,
प्रेमाचं हे आकाश हो…

भाग सुरू...... 

EPISODE 4. 


आदीन  , त्याची माँ  सावित्रीदेवी दोघेही आंबिकादेवी आज्जींच्या खोलीत चालत आले .. 

        खोलीत गोळ्यांचा, सलाईनचा वास येत होता.- 

         - खोलीत मंद प्रकाश होता  , खोलितल्या खिडक्यांभोवती पडदे ओढ़लेले -  समोर असलेल्या शाही बेडवर - आंबिकादेवी - उशीला टेकून बसलेल्या , बाजुला उभी नर्स त्यांना काचेच्या पाण्याचा ग्लास देत होती -  

        तो काचेचा ग्लास घेऊन त्यांनी पाणी पिल- व जिभेवर ठेवलेल्या गोळ्या पाण्यासोबत गिळून  टाकल्या -   

     " आज्जी !"  आदीनने त्याच्या आज्जीला हाक दिली.  

        सफेद साडी घातलेल्या , वयोमानाने जरा सुरकुतलेला चेहरा- पण नजर मात्र स्थिर होती.. - त्यात नजरेत एक दरारा होता . - 

       परंतू आदीनकडे ती नजर वळताच - त्यात मायेचा , ममतेचा अंश उतरला..- 

       " आदीन ssss बाळ  आलास तू !" 
आज्जींचा हळका आवाज  घुमला..!  

आदीन - चेह-यावर मळूल, काळजीमय भाव डोळ्यांत ठेवत - आज्जीच्या बाजुला बेडवर बसला - त्याने आज्जीचा एक हात आपल्या दोन्ही हाती घेतला..- 
        
        " हो आज्जी,  dad चा निरोप आला - आणि लागलीच निघालो मी !"  आदीन आंबिकाआज्जीकडे प्रेमाने पाहत म्हंटला. 

       आंबिका आज्जींनी सुद्धा आदीनच्या हातावर आपला दुसरा सलाईन लावलेला हात ठेवला.. -  

         

        " आदीन , बस्स आता शेवटचे काही दिवस उरले  आहेत  रे माझे !" आंबिकाआज्जी हळु आवाजात म्हंटली. 

        " नाही आज्जी , असं काहीही बोलू नकोस- मी तुला ईतक्यात कुठेही जाऊन देणार नाही ..!" आदीनचे डोळे नकळत पाणावले गेले.
    
     " त्याच्या सत्तेपुढे कोणाचंही काहीही चालत नाही बाळा - बरं असो - माझी एक ईच्छा आहे - तेवढी  पुर्ण करशील.. .!" आज्जीने मंद स्मित हास्य करत  - आदीनकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं..  

        त्यावर आदीनने एकवेळ मागे वळुन सावित्रीबाईंकडे आपल्या माँ कडे पाहिलं-  
त्यावर सावित्रीबाईंनी डोळे मिटून मान होकारार्थी  हळवली.. 

         आदीनने  पुढे आपल्या आज्जीकडे  पाहिलं - 

      " हो आज्जी !" नम्रपणे तो  ईतकंच म्हंटला. 

     त्याची आज्जी काय बोलेल - काय नाही ? 
ह्याचा विचारही त्याने केलं नाही -  पण त्याच्या आज्जीच्या तोंडून जी ईच्छा बाहेर पडली - ती ऐकून मात्र आदीनसहित सावित्रीदेवी दोघांचे डोळे धक्काबसल्यागत विस्फारले.. 

        "   - ज्या मुलिसाठी तू आम्हासर्वाँपासून  6 वर्ष  दूर राहायलास- तू  तिच्याशी लग्न करायचंस!"  आज्जीच्या नजरेत एक चमक  , गंभीरता होती -   

        सावित्रीदेवी - आदीन दोघांचे डोळे विस्फारलेल्या, चेह-यावर आश्चर्यकारक भाव होते.. -

         " आई , काय म्हंणताय तुम्ही हे- माझ्या मुलाने त्या मुलीसाठी जे झेळलंय  - 6 वर्ष तो आपल्यापासून  !"  सावित्रीदेवी पुढे काही बोलणार तोच -  आंबिकाआज्जींनी एक हात  वर केला..- 

        आंबिकाआज्जीचा दराराच ईतका होता -की सावित्रीबाई खाली मान घालुन उभ्या राहिल्या - त्यांच्या चेह-यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.   

        " सुनबाई महादेवाच्या मनात जे आहे - 
      तोच ते करतोय - 6 वर्षासाठी  आदीन जिला विसरण्यासाठी  अमेरिकाला गेला -( आज्जी बोलत होत्या - तोच आदीन खिडकीपाशी जाऊन पाठमोरा उभा राहीला -  

   "  आज  आदीन परत आल्यावर ज्या पद्धतीने ह्याची आणि तिची भेट झाली तो योगयोग नाही- खासच नाही, महादेवाच्या मनात काहीतरी आहे म्हंणूनच त्याने ह्या दोघांची भेट घडवलीय...!"  आज्जींच बोलून झालेलं -   तसं त्यांनी आदीनकडे पाहिलं.-  

      " माझे शेवटचे दिवस उरलेत रे  माझ्या राजा..!" आज्जींनी पाणावलेल्या डोळ्यांनी आदीनकडे पाहिलं..- 

        तसा तो हळूचंच - मागे वळाला - पुन्हा आज्जीपाशी येऊन बैडवर बसला - आज्जीचा हात हातात घेऊन-  

        त्याने आज्जीकडे पाहिलं.- 

        " ही तुझी ईच्छा आहे !" 
  आदीनने आज्जीच्या डोळ्यांत निर्मळपणे पाहत म्हंटलं. 

        " होय  !" आज्जींनी एका हाताने आदीनच्या गाळावर हात ठेवलं- व हळूकचंच म्हंणाल्या.  
             " शेवटची !"   
आदीनने आज्जीकडे स्मितहास्यासहित पाहिलं-  

            " ठिक आहे  मी करील  लग्न पण  तिच्याशीच की दुस-या कोणाशी आताच सांगू शकत नाही ..!"    आदीनने अस म्हंणतच - आज्जीच्या खांद्यावर डोक ठेवलं..-    

        ईकडे सावित्रीदेवींच्या चेह-यावर मात्र नकारार्थी, अस्वस्थ,  नावाडते भाव पसरलेले.. 
आज्जींचा तो त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय त्यांना कद्दापी आवडला नव्हता..-  

        तश्याच त्या जरा रागातच खोलीतून चालत बाहेर निघून आल्या -  तोच मागून हाक आली.. 

        " मोठ्या ताई  !"  हाक ऐकून सावित्रीदेवी जागीच थांबल्या.  

        मागे वळाल्या - दरवाज्यापाशी कवितादेवी उभ्या होत्या -  त्या चालत त्यांच्यापाशी आल्या-   

        कविताबाईंनी खाली मान घातलेली- 
नजरेत मळूल निराशेचे - दयनिय भाव होते - लबाड लांड़ग ढोंग करतंय अजुन काय ? अरे पण कवितादेवी तो फिमेल है, फिर त्यांना आपण लबाड लांडगी म्हंणूयात - ठिक है - आगे , देखते है- एक्शन..

        
        " मोठ्या ताई , माफ करा हं - पण मी चोरुन सगळं ऐकलं  - आईंचा हा निर्णय काही मला आवडला नाही पहा, ज्या मुलीमुले आदीन 6 वर्ष आपल्यापासून- खासकरुन तुमच्यापासून दूर राहायला - त्याच मुलीसोबत आज्जी आपल्या आदीनच लग्न लावायला निघाल्यात- म्हंणजे पहा ना - आदीनने त्याच तरुणपणाच आयुष्य त्या मुलीमुळे बर्बाद तर केलंच आहे आणि आता  ! "  कवितादेवी- चालत सावित्रीदेवींच्या मागे आल्या - व एका गालात खूनशी कुत्सिक हसत - जाळ  फेकत म्हंणाल्या. 

        " आता आदीनचा  त्या मुलीमुळे - तरुणपण तर बर्बाद झालंच आहे - पण पुढच्या आयुष्याचंही वाटोळ होईल..!"  

        कवितादेवींच हे बोलन - सबित्रीदेवींच्या काळजात रुतलं - क्षणार्धात ज्वालेची ठिंणगी उमटली- 

        " नाही, मी माझ्या आदीनच्या आयुष्याच वाटोळ  त्या मुलीला करु देणार नाही- आता तू बघच कविता मी काय करते ते..-!"  सावित्रीदेवी नजर पुढे ठेवत - गंभीरपणे म्हंटल्या. 

        त्यावर कवितादेवी- एका गालात रावणाच्या बहिणीसारखी खूनशी कातिल हसल्या..- ( बैकग्राउंड विलेन म्युझिक वाजू लागली) 

      xxxxxxxxx 

राणधवा मेन्सन हॉलमध्ये..-  इन्स्पेक्टर  रणशिंगे उभे होते - त्यांनी डोक्यावरची टोपी काढलेली,  एका गबलेत धरलेली- व दुस-या  हातात चौकलेटी रंगाची छडी होती. 

        त्यांच्या समोरच  वीरेंद्रसिंह- त्यांच्या भाऊ महेंद्रसिंह-  रणविर-आणी यशही उभे होते . 

        " तर असं झालं साहेब!":
   रणशिंगेंनी आदीनची गाडी एयरपॉर्टवरुन निघाल्यापासून ते आदीराला आदीनने सोडवेपर्यंत ह्या सर्वाँना सर्वकाही सांगितलं. 

        " म्हंणजे त्या मुलीला किडनेप - केलतं तर  !" रणविर तर्क लावत म्हंटला. 

       " आपल्याला त्या मुलीशी काहीही घेणदेण नाही - रणवीर !  ती बरी होईपर्यंत आजची रात्र तिला  ईथे राहूदेत , उद्या मी  ह्या एरियातील  पोलिस इन.चार्जशी बोलून तिला घेऊन जायला सांगतो.!"  वीरेंद्रसिंह गंभीर कठोर आवाजात - दोन्ही हात मागे करत - पुढे पाहत मान वर करत  म्हंटले..     त्यावर रणवीरने फक्त मान हळवली..  

        " ठीके राणधवा साहेब आम्हाला निघायची परवानगी द्या !"  रणशिंगे आदबीने म्हंणाले..- 

        " हो या तुम्ही!" 
वीरेंद्रसिंह डोळे मिचकावत - गंभीरपणे म्हंटले. 

इनस्पेक्टर लागलीच उघड्या दरवाज्यातून बाहेर पडले- दरवाज्याबाहेर उभ्या पोलिसजिपमध्ये बसून निघुन गेले..-       
  

            महेंद्रसिंहने - यशकडे पाहिलं - व डोळ्यांनी हळूचंच  - निघुन जाण्याची खून केली- कारण ह्या बाप बेट्याला काहीतरी मेजवानी- शिजवायची , तैयारी जी करायची होती..-   

       यश आपल्याकडे कोणाचंही लक्ष नाही हे पाहून रुमच्या दिशेने निघुन गेला .-  व महेंद्रसिंहने पटकन - मोबाईलवर रिंगला टच करत फेके कॉल रिंगटोन वाजवली-  

        " हेलॉ "  म्हंणत शकूनी काकाही ही त्यांच्या रुमच्या दिशेने निघुन गेले...- 

      xxxxx 
महेंद्रसिंहची रुम.. (उर्फ शकूनीकाका  ) 

   यश बैडवर बसून त्याच्या पप्पा महेंद्रसिंहची वाट पाहत बसलेला , तोच दरवाजा उघडला गेला- व खोलीत महेंद्र तर नाही - पण कळ लावी - कवितादेवी चेटकीणीसारखी - दोन्ही हात एकमेकांवर चोळत आत आली-  

        तिच्या चेह-यावर चेटकीणीसारख हसू होतं. 

        " मम्मी, तू ? "  
यशने  विचारलं . 

        " हं मीच,  आमच्या खोलीत मी नाहीतर कोण अशणार  गधड्या !"  कवितादेवी म्हंटल्या.       तसा यश जरा   रागावला - 

      " मम्मे तू मला आता गधड्या बोलत जाऊ नका हा आधीच सांगतो, आता मी मोठा झालोय!" यश गर्वाने मान करत म्हंटला. 
त्याच्या चेह-यावर कुत्र्यासारख हसू पसरलेलं..

        
       "  हो मोठा झालायेस ,पण फक्त अंगाने - तो आदीन बघ - दोन नंबरचा असून त्याला काय काय भेटतंय-  कंपनी , पैसा, ती नवीन आलेली पोरगी - ती पण आता त्याच्याच घश्यात घालायचा विचार म्हातारीचा..!" कवितादेवीने कडवट श्ब्दाए म्हंणतच - तोंड- नाक वाकड केलं -  

        तोच खोलिचा दरवाजा उघडून - महेंद्रसिंह गपचूप- आत आले , येतांना त्यांनी दरवाजा आपल्या मागोमाग लावून घेतला..- 

        " अहो , ऐकलंत का  तुम्ही, हंsssss  तुमच्या आईंना 6 वर्षानंतर आलेल्या - नातवांडांच अजुन लाड करायची हौस आहे - पण आपल्या मुलांना कधी मायेने जवळ घेतलेलं  पाहिलंय का ?-  कोण ती अर्धा तासा अगोदर आलेली- पोरगी तिच्यासोबत लग्न करुन , सगळी कंपनी, घरा दाराची प्रॉपर्टी त्या आदीनच्या घश्यात घालायचा विचार आहे तुमच्या आईचा - म्हंणजे कसं - आदीनच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करुन टाकली-की  आपल्याला रस्त्यावर कटोरा घेऊन भिक मागत बसायची पारी येईल.  ! "  कवितादेवीने कडवट, विषारी, आवाजात म्हंटलं , खरं तर प्रॉपर्टी नावावर करायचं हा विषय तीने मुद्दामूनच Add  करत बोलण्यात टाकलेला. - 

        " अरे बापरे मम्मी काय सांगते , ही तर लेटेस्ट न्यूज हे !" बेडवर बसलेला - यश - धक्का बसल्यागत - आ -वासून म्हंणाला. 

        " तू गप रे गधड्या, आपल्याला भिक मागायला बसावं लागेल ही  काय लेटेस्ट न्यूज आहे का?  हं ssss!" कवितादेवी रागात म्हंटल्या .-  

       आणि ईकडून पुन्हा गधड्या ऐकून - यशला मिर्ची झोंबली.. 

        " मम्मे मला गधड्या बोलू नको हं लास्ट सांगतो !"  कवितादेवी - यश दोघांची   तू तू मैं मैं सुरु झाली-

        " ए  गप्प बसा रे  तुम्ही दोघं..-   !" 
महेंद्रसिंह एकदमच राक्षसी गर्जनी करत ओरडला - तशी ही दोघ आवंढा गिळुन गप्प बस बसले.. 

        " मी जिवंत असेपर्यंत प्रॉपर्टी त्या आदीनकडे जाऊ देणार नाही!" महेंद्रसिंहने - डोक्यात काहीतरी चाल रचायला सुरुवात केली- व स्मार्टफोनवरुन कोणालातरी कॉल लावला..-  व फोन कानाला लावून 5 सेकंद नंतर म्हंटले.. 

        " हेलॉ चंदू अप्पा - मी बोलतोय महेंद्र राणधवा - हो हो ती मुलगी आमच्याच घरी आहे - आदीनने तिला ईथे  आणलीये..- तुमच्या साहेबांना तेवढी खबर द्या ..- आणि त्या आदीन व त्या मुलीचा दोघांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका, हो हो ठीके वाट पाहतो तुमच्या फोनची..!"  महेंद्रसिंहच्या चेह-यावर आसुरी आनंद उमटलेला - त्याच आनंदात त्याने फोन कट केलं - 

        मागे कवितादेवी यश - दोघेही महेंद्रसिंहकडे आभिमानाने पाहत होते..- जसं काय  ह्या शकूणीने - मोठा तीर मारलेला...

       " कविता , आता तू बघच - हा चंदू अप्पा - ह्या आदीन , आणि त्या मुलीचा कसा बंदोबस्त करतो ते..!' महेंद्रसिंहच्या चेह-यावर पापी हसू उमटलं..-   

        xxxxx  

त्याच दिवशी - दुपारी 4 वाजता.. 
आदीनच्या खोलीत .  बैडवर झोपलेली आदीरा अजुन बेशेद्धीत होती - 

     बैडपासून जरा दूर सोफ्यावर आदीन  - सान्वी  बसलेले -  पुढे असलेल्या टिपॉयवर कॉफीचे दोन  रिकाने कप ठेवलेले -  

      " अजुन शुद्ध कशी आली नाही हिला !" 
आदीनने सान्वीला म्हंटलं.  

        त्याच्या स्वरात त्याने काळजी , चिंता  ह्या भावनिक मिश्रणांना जरा दूरच ठेवलेलं..- घरातल्यांना प्रत्येकाला त्या दाखवायचं होतं - की तो तीची काळजी करत नाही, त्याला तिच्याशी काहीही घेणदेण नाही..- 

       " भाय , डॉक्टरांनी सांगितलं आहे - 2 -3 दिवस तिने काही खाल्लं नाही- आणि ती कशालातरी खुप भ्यायलीये - सो तीची हाळत सध्या नाजुक आहे - आणि अश्या अव्स्थेत आरामाची गरज असते..-  सो असू शकतं की तिला होशमध्ये यायला अजुन वेळ लागू शकतो.!"  सान्वी म्हंणाली. 

        त्यावर तीचे विचार ऐकून - आदीनला तिचा आभिमान - वाटला..- तसा तो मंद स्मित हसत म्हंटला... 

        " वॉव  सान्वी तुला त र खुप माहीतीये यार , डॉक्टर वैगेरे बनायचं विचार आहे का ?" 
  आदीनने  सहजच मस्करी केली होती..- पण सान्वीनेच त्याची मस्करी सत्यात उतरली.. 

      " भाय  , मी ऑलरेडी  mbbs final year + gold medalis आहे , माझं डॉक्टरचा शिक्षण पुर्ण झालंय!" सान्वी जरा निराश होऊन , खाली मान घालुन म्हंणाली.- 

       " व्हॉट!" आदीनला जरा धक्काच बसला हे ऐकून!"  माय गॉड मग तर तू मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामाला असशील - नाही - आणि आपल्या आज्जीची काळजी घेतीयेस की नाही ..!" आदीनने खुश होत विचारलं. 

        पण  ? सान्वीने खाली मान घातलेली- ती वर पाहतच नव्हती -   तसं आदीनने अलगद तिची हनुवटी धरत - तिला आपल्या दिशेने फिरवलं.. 

      तर तीचे डोळे पाण्याने भिजलेले..- 

        " अरे पागल, तू रडतीयेस का - मी काही तुझ्या लग्नाची बोलणी थोडी करतोय ?!" आदीनने काळजीयुक्त स्वरात विचारलं..

त्याच्या लग्नाच्या जॉकवर ती जराशी खुद्दकन हसली, मग तीने एका हाताने आपले दोन्ही डोळे पुसले. 

        "  मम्मी -पप्पांना नाही आवडत मला दवाखाण्यात पाठवायला !" सान्वीने सांगितलं. 

        " का ?"  आदीनने न समजून विचारलं.

        " मम्मा म्हंणतीये की आपल्या खाणदानात एवढ पैसा आहे , मग काय गरज काम धंद्याची, उगीचंच लोकांना नाव ठेवायला कारण भेटेल- बघा राणधवांची एकुलती लेक - पांढरा कोट घालुन हॉस्पिटलमध्ये फिरतीये !'  
सान्वीने दुखी स्वरात सांगितलं. 

        " औह , असं आहे काय !" आदीनने समजल्यासारख म्हंटलं.   

        " पण मी आज्जीची औषध वैगेरे सर्व पाहतीये - पण भाय , एकदा तू बोलना बाबांशी - ते तुझं नक्की ऐकतील- तसंही तू गेल्या 6 वर्षात  खुप बदललायेस - यू have पावर भाई - मम्मा - पप्पा तुझं शब्द खाली पडून  देणार नाहीत- !" सान्वी  आशेने भरलेल्या नजरेने आदीनकडे पाह म्ह्ंटली. 

        त्यावर आदीनने जास्त काही रियेक्ट केलं नाही, पण दोन्ही ओठ पुढे आणत तो - ठीक आहे ईतकंच - म्ह्ंटला..- 

        " येssss  थँक्यु भाय!"
सान्वी ईतकी खुश झाली की तीने आदीनला मिठीच मारली-   त्यावर जरासा हसतच आदीनने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला मायेने थोपटलं. 

        " ओके ओके  आई विल टॉक..!"
आदीन म्हंटला..
        

           आण तोक्ष आदीनचा फोन वाजू लागला..-   तसा तो खिशातून फोन काढत रुममधून बाहेर गेला..- 

        आण तेवढ्यातच तो बाहेर जाताच

        ईकडे बेडवर बेशुद्धीतून  आदीरा बाहेर येऊ लागली... 

       तीने हळकेच डोळे किलकिले करत उघडले - तिच्या टपो-या डोळ्यांना -  चंदेरी रंगाच्या  - लाईटसने उजळलेली रुम दिसली.. 
अचानक पडलेल्या प्रकाशाने तीचे डोळे दिपले-
पापण्यांची 4-5 वेळा उघडझाप केली- तसे डोळे उजेडाला सरावले.. 

            हाताचा एक कोपरा बैड़वर ठेवत ती जागेवर ऊठून बसायचा प्रयत्न करु लागली..- 

        तिची ही अनपेक्षित झालेली हालचाल - 
सान्वीला दिसली- तिच्या चेह-यावर आनंद झलकला.-  

        " हेय आदीरा ? " 
   सान्वी सोफ्यावरुन ऊठली- पटकन  आदीरापाशी आली- तीने आदीराला आधार देत - ऊठवलं -  बैडमागे टेकवत बसवलं... 

      " आदीरा कसं वाटतंय आता ? !" 
सान्वीने आदीराची मनगटावरची  नाडी 10-15 सेकंद तपासली- सर्वकाही ठिक होतं.  तीचे श्वास पाहिले..- सर्वकाही ठिक होतं.

        " आदीरा कसं वाटतंय?" सान्वीने पुन्हा काळजीयुक्त स्वरात विचारलं. 

        त्याव काहीश्या जड़, अशक्त नजरेनेच खालावलेल्या स्वरात म्हंटलं. 

        " मी ठिक  आहे - आता बस थोडं अशक्त आहे - !"   

         " गुड  , आता  तू जास्त विचार करु नकोस, भाय आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत, तुला ईथे काहीही खतरा नाहीये - वेट मी भायला सांगून आले की तूला शुद्ध आलिये !":

         " भाय ?" आदीराने न समजून विचारलं.

        " हो भाय, मिस्टर :आदीन राणधवा!" 
  सान्वी मंदस्मित हसत म्हंणाली.. व  खोलितून निघुन गेली- 

        परंतू तीचे ते शब्द मिस्टर : आदीन राणधवा तिच्या कानांत खोल खोल जात घुमत राहिले - आणि 6 वर्षापुर्वीची आदीरा 18 वर्षाची असतानाची ती  आठवण तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेली... 

        क्रमश:  ...